Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


महापालिकेच्या हद्दीतील वृक्षगणना करण्याची मागणी


Main News

पिंपरी, दि.७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील वृक्षगणना करण्यात यावी, अशी मागणी दिनेश यादव यांनी महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वृक्षांचे संगोपन व्यवस्थित होत नसतानाही वृक्षांची संख्या भरमसाठ असल्याचा दावा उद्यान विभागाकडून केला जात आहे. मात्र सन २००५ पासून वृक्षगणनाच केली नसल्याने उद्यान विभागाचा हा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे महापालिका हरीत शहराबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेकडून दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जातो. मात्र, लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष केले जाते. वृक्षरोपण कार्यक्रमातील किती वृक्ष रुजले याचा ठोस आकडा उद्यान विभागाकडे उपलब्ध नाही. अंदाजे ९३ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र आहे.   

शहरात पूर्वी झाडांचे प्रमाण जास्त होते. झाडे तोडण्याच्या बदल्यात त्यांचे पुन्हा वृक्ष रोपण करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने झाडांची संख्या कमी होत चालली आहे. सन २०१६-१७ मध्ये वृक्ष प्राधिकरण समितीने पालिकेच्या विकास कामासाठी २७० प्रकारणामध्ये वृक्षतोडीला परवानगी दिली. परवानगीमधील १ हजार २७५ झाडे समुळ नष्ट करण्यात आली.  तर त्यातील ६६२ वृक्षांचे पुनर्रोपण  करण्यात आले. यामुळे ग्रीन सिटी पुरस्कार मिळालेल्या शहरात वृक्षांची संख्या भरपूर असल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरत आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin