Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


ब्राह्मण महासंघाच्या वतीने गडकरींच्या पुतळ्याच्या तोडफोडीचा पिंपरीत निषेध


Main News

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - प्रसिद्ध नाटककार व जेष्ठ साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या पुण्यातील संभाजी बागेतील पुतळ्याची तोडफोड केल्याच्या विरोधात 'अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करुन या घटनेचा निषेध करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष धनंजय बुडूख, कार्याध्यक्ष पवन वैद्य, सरचिटणिस मुकुंद कुलकर्णी, उपाध्यक्ष सतीश आचार्य, प्रवक्ते अरविंद खुळगे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर शेडगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश कुलकर्णी, लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांनी या घटनेमागील सूत्रधार असलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेवर तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ब्रिगेडच्या पुस्तकांवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली.

या आंदोलनात महासंघांचे जेष्ठ कार्यकर्ते गोपाळ भसे, रमेश पाठक, गोपाळ कळमकर, चैतन्य देशपांडे, सुरेंद्र कुलकर्णी, माधुरी ओक, समीर देशपांडे, सुधीर कुलकर्णी, शशांक देशमुख, भाजपाचे मधुकर बच्चे, प्रसाद जोशी आदी सहभागी झाले होते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin