Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


महागाई भत्त्यासाठी महापालिका कर्मचारी महासंघाचे आंदोलन


Main News

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्यलेखापाल राजेश लांडे यांना शासन सेवेत परत पाठवावे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी (दि. ६) आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर महासंघाच्या प्रतिनिधींनी महापौर शकुंतला धराडे व आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी आयुक्त वाघमारे यांनी कायदेशीर बाजू तपासून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत महागाई भत्ता देण्यास तत्वतः मान्यता दिली. 
 
महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मुख्य लेखापाल पदासाठी महापालिकेचे अधिकारी पात्र असताना या पदावर शासन सेवेतील राजेश लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या पात्र अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असून, लांडे यांना पुन्हा शासन सेवेत पाठविण्यात यावे, अशी महासंघाची मागणी आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता लागू करावी, अशीही महासंघाची मागणी आहे.

परंतु, मुख्य लेखापाल हे कायदेशीर बाबी पुढे करून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा महासंघाचा आरोप आहे. महासंघाने अनेकदा निवेदने देऊनही त्याबाबत दखल न घेतल्यामुळे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाचे हत्यार उपसले. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. आयुक्तांनी त्याची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही महासंघाच्या वतीने देण्यात आला.

आंदोलनानंतर आयुक्त वाघमारे यांनी महासंघाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलाविले. यावेळी महापौर शकुंतला धराडे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, रामदास बोकड, नगरसेविका शमीम पठाण, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर आदी उपस्थित होते. आयुक्त वाघमारे यांनी कायदेशीर सल्ला घेऊन महापालिका कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर  दोन दिवसात महागाई भत्ता देण्यात येईल, असे सांगितले. तसेच मुख्य लेखापाल राजेश लांडे यांना पुन्हा शासन सेवेत घेण्याबाबत शासनाकडे फेरप्रस्ताव पाठविण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिल्याचे महासंघाचे अध्यक्ष झिंजुर्डे यांनी सांगितले.  
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin