Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजप इच्छुकांच्या बुधवारी मुलाखती


Main News

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता बुधवारी (दि. ४) पिंपरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे. संत तुकारामनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी दहा वाजता इच्छुकांच्या मुलाखतींना सुरूवात होणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

महापालिकेच्या ३२ प्रभागांपैकी आठ प्रभाग पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. या सर्व प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची भाजप मुलाखत घेणार आहे. निवडणूक कार्ड कमिटीचे सदस्य गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत.

प्रभाग क्रमांक दहापासून मुलाखतींना सुरूवात होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता शाहूनगर-मोरवाडी, साडेअकरा वाजता काळभोरनगर-दत्तवाडी-चिंचवड स्टेशन, दुपारी साडेबारा वाजता आकुर्डी गावठाण-प्राधिकरण, दुपारी दोन वाजता संत तुकारामनगर-विशाल थिएटर, दुपारी साडेतीन वाजता उद्यमनगर-भाटनगर, सायंकाळी पाच वाजता जिजामाता हॉस्पिटल-पिंपरीगाव, सायंकाळी सहा वाजता दापोडी-कासारवाडी आणि रात्री सात वाजता खराळवाडी-नेहरूनगर-अजमेरा कॉलनी या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin