Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


पिंपरी, गांधीनगर येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन नेहरूनगरमधील महिलेचा मृत्यू


Main News

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी, गांधीनगर येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेचे पती जखमी झाले. ही घटना आज (सोमवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

शशिकला प्रताप यादव (वय ६०, रा. नेहरुनगर, पिंपरी), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती प्रताप ज्ञानोबा यादव (वय ६४) हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव पती-पत्नी दुचाकीवरून नेहरुनगरहून पिंपरीच्या दिशेने जात होते. प्रताप यादव हे दुचाकी चालवत होते. ते गांधीनगर येथे आले असता महिंद्रा कंपनीच्या बांधकाम साईटवरून एक ट्रॅक्टर अचानक रस्त्यावर आला. त्यामुळे  प्रताप यादव यांनी दुचाकीचे ब्रेक दाबले आणि त्यांची पत्नी रस्त्यावर पडल्या. त्यावेळी ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या तोंडावरून गेले. त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांच्या मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin