Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


सर्व शाळांचे प्रवेश अर्ज ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे शिक्षण मंडळाचे आश्वासन


Main News

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व शाळांच्या प्रवेशांचे वेळापत्रक व अर्ज ऑनलाइन उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंडाळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. शिक्षण मंडळ प्रशासनाने त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. 

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने १७ डिसेंबर रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. शाळेचे प्रवेश अर्ज पालकांना ऑनलाइन उपलब्ध व्हावेत, पालकांना रांगेत उभे राहु लागू नये, वेळापत्रक एकाच वेळी महापालिकेच्या वेबसाईटवर जाहिर करण्यात यावे, यांसह विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या. त्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, विनोद भांगे, उमेश काटे, विशाल घोडेस्वार आदी उपस्थित होते.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin