Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


नववर्षाच्या स्वागतासाठी कॅश नसली तरी ऐश होणारच!


Main News

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघी उद्योनगरी सज्ज झाली आहे. नोटाबंदीमुळे चलनतुटवडा असला तरी नववर्ष स्वागताच्या उत्साहावर त्याचा फार परिणाम झालेला दिसत नाही. पिंपरी-चिंचवड आणि जवळच्या ग्रामीण परिसरातील रिसॉर्ट्सपासून क्लब्सपर्यंतची सर्व ठिकाणे केव्हाच बुक झाली आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरातल्या घरात पार्टी करण्याचा किंवा ऑनलाइन पेमेंट करून बाहेर जाण्याचा पर्याय निवडला जात आहे. त्यामुळे खिशात कॅश नसली तरी ऐश करण्यात कोणतीही कसर राहणार नसल्याचे दिसत आहे.

२०१६ ला बायबाय करत २०१७ चे स्वागत नाचगाणे, खानपान, गेम्सच्या संगतीने करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. अर्थात यावर्षी चलनतुटवडा असल्याने आधीच बजेटचा नीट विचार केला गेला आहे. सर्वसामान्य लोक आपापल्या सोसायट्यांमध्ये हटके पद्धतीने हा दिवस साजरा करताना दिसतील. तर, उच्चभ्रूंसाठी मिडनाइट पूल पार्टी, मास्क पार्टी, रात्रभर नॉनस्टॉप पार्टी, खास कपल्ससाठी पूल साइड कॅण्डल लाइट पार्टी ही यावर्षीची आकर्षणे म्हणता येतील. 

प्रत्येकी तीन हजार ते तब्बल पन्नास हजारपर्यंत या पार्ट्यांचे दर आहेत. तसेच अनलिमिटेड खान-पान असलेल्या पार्ट्यांमध्ये डिस्को, बॉलीवूड, अरेबियन नाइट्स यांसारख्या थीम्सही बघायला मिळतील. कृत्रिम धबधबे, निऑन लाइट असलेले कॉकटेल शेकर्स, हिप पॉप, डीजे असा एकूण सगळ्या रंगीत पार्ट्यांचा नूर असेल.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin