Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


महापालिकेचे मुख्य लेखापाल लांडे यांची बदली करा; कर्मचारी महासंघाची मागणी


Main News

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे हे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आड येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत ते नकारात्मक भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यांना पुन्हा राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेच्या आस्थापनेवर मुख्यलेखापाल हे पद मंजूर आहे. या पदावर १९९१ ते २०१२ या कालावधीत महापालिकेतील लेखा संवर्गातील ज्येष्ठ व पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत होती. त्यामुळे या  पदावर शासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करू नये, याबाबत स्थानिक आमदार, पक्षनेते, विरोधी पक्षनेते व कर्मचारी महासंघाने वारंवार पत्रव्यवहार केला आहे. या पदावर काम करण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणारे कर्मचारी महापालिकेत उपलब्ध आहेत. तरीही शासनाने राजेश लांडे यांची महापालिकेच्या मुख्य लेखापालपदी प्रतिनियुक्तीद्वारे नेमणूक करून महापालिका कर्मचाऱ्यांना घटनेने दिलेल्या पदोन्नतीच्या मुलभूत हक्कास बाधा निर्माण केली आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतची मुलभूत हक्क हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महासभेनेही महापालिकेच्या कर्मचाऱ्याचीच पदोन्नतीने मुख्यलेखापालपदी नेमणूक करण्याचा ठराव केला आहे. 

त्याची अंमलबजावणी करण्याबाबत महापालिका प्रशासनाने मार्गदर्शन करावे. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्याबाबत महासंघ व प्रशासन यांच्यात १९७९ मध्ये करारनामा झाला आहे. मात्र सध्याचे मुख्य लेखापाल राजेश लांडे हे या करारनाम्याकडे दुर्लक्ष करून जुलै २०१६ पासून द्यावयाचा महागाई भत्ता प्रस्तावास अनुकूलता दर्शवत नाहीत. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आड येऊन त्यांना लाभांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय न घेणाऱ्या मुख्य लेखापाल लांडे यांना शासकीय सेवेत पुन्हा घेण्यात यावे. या जागेवर महापालिकेतील पात्र कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.” 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin