Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


तळवडेतील अंतरा दास खुनप्रकरणी बंगळूर येथून तरूणाला अटक


Main News

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - संगणक अभियंता अंतरा देबानंद दास (वय २३) हिचा खून केल्याच्या संशयावरून एका तरुणाला पुणे ग्रामीण पोलिसांनी बंगळूर येथून गुरुवारी अटक केली. संतोषकुमार अखिलेश प्रसाद गुप्ता (वय २४, रा. आरा, भोजपूर, बिहार) असे त्याचे नाव आहे. तो बंगळूर येथे आयटी कंपनीत कामाला होता. त्यावेळी त्याची अंतराशी मैत्री झाली होती. त्याने एकतर्फी प्रेमातून मित्राच्या मदतीने तिचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.
 
अंतरा ही मूळची पश्‍चिम बंगालची असून ती सहा महिन्यांपूर्वी तळवडे येथील कॅपजेमिनी आयटी कंपनीत रुजू झाली. ती प्राधिकरण येथे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. तळवडे येथे शुक्रवारी रात्री अंतराच्या डोक्‍यावर हत्याराने वार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
 
संतोषकुमार हा अंतराला त्रास देत होता, अशी माहिती तिच्या कुटुंबीयानी पोलिसांना दिली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांचे पथक सोमवारी बंगळूरला गेले होते. या पथकाने तेथून संतोषकुमार याला ताब्यात घेतले. त्याला बुधवारी पुण्यात आणून चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सतिश होडगर, शंकर जम, सतिश कुदळे, गणेश महाडीक, सुनील जावळे, देहू रोडचे पोलिस निरीक्षक अरुण मोरे, प्रकाश अहिवळे, बाळासाहेब अहिवळे यांनी ही संयुक्‍त कारवाई केली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin