Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


शहर वाहतूक पोलिसांच्यावतीने आजपासून वाहतूक सुरक्षितेबाबत जनजागृती


Main News

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने २९ ते ३१ डिसेंबर या दरम्यान शहरातील विविध भागात वाहन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई व वाहतूक सुरक्षितेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 


३१ डिसेंबरनिमित्त आणि नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करताना शहरात दारु पिऊन बेदरकारपणे गाडी चालविण्याचे प्रकार घडत असतात. तसेच वाहन धारकांकडून  कर्ण कर्कश हॉर्न वाजवले जातात, विना हेल्मेट दुचाकी चालवणे, ट्रीपलसीट दुचाकी चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे. अशा प्रकारावर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमे अंर्तगत कारवाई करण्यात येणार आहे. विशेषकरून यंदाच्या ३१ डिसेंबरला वाहतूक पोलीस हॉटेल चालकांना व  नागरिकांना काही सुचना करून जनजागृती करणार आहेत.
 
शहरातील महत्वाच्या ठिकाणी व वाहनांवर बँनर लावून ही जनजागृती करण्यात येणार आहे. विशेषत: शहरातील सर्व हॉटेल, क्लब मालकांना हॉटेल मध्ये येणाऱ्या नागरिकांची पर्यायी चालकाची किंवा कॅबची व्यवस्था करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित रहावी, यासाठी महत्वाच्या ठिकाणी ५० अधिकारी आणि ६०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. 

दरम्यान शहरवासीयांनी नियमांचे उल्लंघन न करता वाहने चालवावीत. तसेच    नविन वर्षाचे स्वागत करताना अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.  

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin