Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


मेट्रोसाठी जमिनीची तपासणी करणारे यंत्र नादुरूस्त


Main News

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - मेट्रोच्या भूमिपूजनानंतर अवघ्या काही दिवसांत त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असले, तरी दुसऱ्या बाजूला जमिनीची तपासणी करण्यासाठी मुंबईहून पाठवण्यात आलेली मशिनरी पूर्णपणे नादुरूस्त झालेली आहे. त्यामुळे अद्याप ते काम सुरू करणे शक्‍य झालेले नाही. दरम्यान, येत्या एक ते दोन दिवसांत नवीन मशिनरी दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पिंपरी ते कृषी महाविद्यालयापर्यंतचा मार्ग एलिव्हेटेड राहणार आहे. त्यामुळे जमिनीखाली ५० मीटरपर्यंत काय आहे, दगड कुठे आहेत याची तपासणी करण्याचे काम महामेट्रोकडून हाती घेण्यात आले आहे. मेट्रोच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी ही तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात होण्याआधी सर्वेक्षण आणि जमिनीची तपासणी करण्यात येणार आहे. 

भूमिपूजनानंतर लगेचच हे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी बाद झालेली मशिनरी आल्याने ते सुरू होऊ शकलेले नाही. नवीन मशिनरी आल्यानंतर लवकरच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वल्लभनगरजवळील जमिनीची तपासणी करण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin