Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


देहरोड कॅन्टोमेंन्ट परिसरातील मटका व्यवसाय बंद करण्याची मागणी


Main News

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - निगडी येथील देहरोड भागातील स्मशान भूमीच्या  मागील बाजुस राजरोसपणे अवैध मटका व्यवसाय सुरू आहे. तो तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी भिम छावा शहर संघटनेच्यावतीने केली आहे. याबाबतचे निवेदन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.  

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडीतील देहरोड कॅन्टोमेंन्ट भागातील स्मशानभूमीच्या मागील बाजुस असलेल्या रूपीनगर मिलीटरी हद्दीत अनेक दिवसापासून अवैध मटका व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय बंद करण्यासाठी भिम छावा शहर संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. 

दरम्यान आंदोलन केले म्हणून मटका व्यवसायातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संघटनेच्या महिला अध्यक्षा कविता मुकूंद गायकवाड यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच तलवारीचा धाक दाखवून त्यांना दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही दखल घेतलेली नाही.   

तसेच मटका व्यवसायातील या गुंडाकडून या परिसरात दमदाटी, दहशत पसरविण्याचे प्रकार सुरूच आहेत. तरी या गुंडावर कायदेशीर कारवाई करून मटका व्यवसाय बंद करण्यात यावा. या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे शहराध्यक्ष संतोष चव्हाण, महिला अध्यक्षा कविता गायकवाड यांनी या निवेदनातून दिला आहे.    

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin