Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महापौर धराडे यांचे मोदींना साकडे


Main News

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रलंबित प्रशनांबाबत महापौर शकुंतला धराडे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. महापौरांनी पंतप्रधांना पाठवलेल्या पत्रात शहरातील रेडझोन स्मार्ट सिटी योजनेत समावेश, मेट्रो प्रकल्प निगडीपर्यत करावा, बोपखेल गावासाठी नदीवर तातडीने पूल बांधावे, अशी मागणी केली आहे. 

महापौर धराडे यांनी मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड शहरातील रेडझोन, शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश, निगडीपर्यत मेट्रो, बोपखेल गावासाठी नदीवर पूल बांधणे हे प्रश्न प्रलंबित आहेत. हे सर्व प्रश्न केंद्र सरकारशी निगडीत आहेत. त्यामुळे ते वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले आहेत. महापालिकेने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध काम केली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ शहराचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. या पुरस्काराप्रमाणेच शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांनी मोदी यांना केली आहे.”
 
 


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin