Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


महापालिकेसमोरील ग्रेड सेपेरेटरमध्ये ट्रक अडकल्याने वाहतूक कोंडी


Main News

पिंपरी, दि. २७  (पीसीबी) - महापालिकेसमोरील ग्रेड सेपेरेटरमधून कापसाच्या गोण्या घेवून जाणारा ट्रक पुलाच्या स्लॅबला अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त उंचीवर कापसाच्या गोण्या बांधलेल्या होत्या. यामुळे ट्रक अडकला. त्यातच चालकाने ट्रक पुढे नेल्याने काही गोण्या रस्त्यावर पडल्याने  काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.  
 
सायंकाळी साडेपाच ते सहाची वेळ असल्याने या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. या वेळेस कार्यालये, कंपनीतील कर्मचाऱ्यांची सुट्टी झालेली असते. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच ट्रकमधील कापसाच्या गोण्या रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले. दरम्यान काही वेळाने या गोण्या बाजूला करण्यात आल्या. त्यानंतर  विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin