Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


राष्ट्रवादीच्या वक्तृत्व स्पर्धेत प्रमोद सुरवसे प्रथम


Main News

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  संसदीय कार्यकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण आणि राष्ट्रवादी युवती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रमोद सुरवसे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला. 

पिंपरी येथील कामगार भवनात ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये शहरातील ८१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पवार साहेबांचे नेतृत्व, पवार साहेबांची कृषी क्षेत्रातील भूमिका, महिला विषयक धोरण या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रमोद सुरवसे याने प्रथम क्रमांक, तर आशुतोष नेवसे आणि पूजा पवार या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. रेश्मा राऊत व प्राजक्ता गायकवाड यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. प्रा. डॉ. सौ. पौर्णिमा कोल्हे, सोनल वाळुंज यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

यावेळी संजोग वाघेरे, अरूण बोऱ्हाडे, फजल शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन वर्षा जगताप, सुनिल गव्हाणे, विशाल काळभोर, रविंद्र ओव्हाळ यांनी केले. स्पर्धेसाठी विनय शिंदे, विनोद कांबळे, रशीद सय्यद, रूपाली धाडवे, ज्ञानेश्वर मोरे, अलोक गायकवाड, विनोद भांगे यांनी परिश्रम घेतले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin