Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


निगडीत वसुंधरा महोत्सवाचे उद्घाटन


Main News

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) - शहरात प्रथमच आयोजित ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चिञपट महोत्सवा’चे दिमाखदार उद्घाटन झाले. निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हा सहकार्यवाह रविकांत कळंबकर आणि महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतीमेचे पुजन करुन महोत्सवाचे उद्घाटन केले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बंसल, उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, रत्नाकर देव, भास्कर रिकामे, प्रदीप पाटील, नरहरी वाघ, विवेक जोशी आदी उपस्थित होते.

मानवाने पर्यावरणाचा विनाश केला आहे. पुढच्या पिढीला एक चांगला निसर्ग आणि पर्यावरण द्यायचे असेल, तर पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. या किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने घेतलेल्या निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. वाहतूक व्यवस्था परिणाम आणि उपाय, शासकीय जागेचा उपयोग आणि उपाय, ई कचऱ्याचे परिणाम व्यवस्थापन, पाणी विज अपव्यय आणि कारणे या विषयांवर खुला गट, शालेय आणि महाविद्यालयीन गट या तीन गटांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. 

या स्पर्धेत तीनही गटांत एकूण१,९२४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे परिक्षण अमोल देशपांडे, शैलेजा सांगळे व बिल्वा देव यांनी केले. तसेच स्पर्धेचे संयोजन प्रदीप पाटील व गजानन राजमाने यांनी केले. अश्विनी अनंतपूरे, मिताली गीघ, अनुप्रीता भोंसुले, माधूरी मापारी, नीता जाधव यांनी परीक्षन केले. 

विजेत्यांची नावे 

खुला गटः प्रथमः प्राजक्ता वडापुरकर, व्दितीयः हेमलता अष्टेकर, तृतीयः वनिता जोरी 
महाविद्यालयीन गटः प्रथमः ज्योती गायकवाड, आणि श्रद्धा ञिपाटी (विभागून) व्दितीयः संस्कृती पाटकर, तृतीयः आशेया मोयूद्दीन, उत्तेजनार्थः आदीत्य माने 
शालेय गटः प्रथमः साक्षी आव्हाड, व्दितीयः वैभव जाधव, तृतीयः मुथीयान, उत्तेजनार्थः राधा येलेगांवकर व सई मेहता.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin