Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


रिझर्व्ह बँकेचे सर्व निर्णय पंतप्रधानच घेतात - अमर्त्य सेन


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - जुन्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेली ३० डिसेंबरची मुदत ‘हा रिझर्व्ह बँकेचा निर्णय होता, असे मला वाटत नाही. हा पंतप्रधानांचा निर्णय असू शकतो. कारण सध्या रिझर्व्ह बँक काही निर्णय घेते आहे, असे वाटत नाही,’ अशा शब्दांमध्ये नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी सरकारच्या रिझर्व्ह बँकेमधील वाढत्या हस्तक्षेपावर बोट ठेवले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येणारे सर्व निर्णय पंतप्रधान मोदींकडून घेतले जात असल्याचे सेन यांनी सांगितले. रघुराम राजन गव्हर्नर पदावर असताना रिझर्व्ह बँक स्वायत्त संस्था होती. या संस्थेच्या प्रमुखपदी आय. जी. पटेल आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या प्रतिभावंतांनी काम केले आहे. रघुराम राजन यांच्याआधी माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी आणि बिमल जलान यांच्यासारख्या व्यक्तींनी गव्हर्नरपदी काम करताना रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता टिकवली होती,’ असे सांगून अमर्त्य सेन यांनी विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin