Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


पिंपरी महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक पक्षांतराची लागणार कसोटी


Main News

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आता राजकीय पक्षांना जेमतेम महिला मिळणार आहे. उमेदवारांची निवड आणि इतर प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. इच्छुकांनी नव्या वर्षाच्या प्रारंभापासूनच जोरदार तयारी चालवली होती. काहींनी सरत्या वर्षात आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत नवा घरोबा केला. नाशिकमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने ४४ ते ४५ नगरसेवक पक्षांतर करून इतिहास घडविणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय पक्षांच्या सद्यःस्थितीचा घेतलेला कानोसा…. राष्ट्रवादी काँग्रेसची अस्तित्वाची लढाई अभेद्य बालेकिल्ला म्हणून राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवडमधील सत्तेचे कोण अप्रूप राज्यभर दहा वर्षे टिकून होते. मधल्या काळात पवना आणि इंद्रायणीतून बरेच पाणी वाहून गेले अन् आज हीच राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल ८३ नगरसेवक निवडून देत पिंपरी-चिंचवडकरांनी अजित पवारांवर कमालीचा विश्वास टाकला होता. शहर झोपडपट्टीमुक्त करून दाखिवतो, असा शब्द देणाऱ्या अजित पवारांनी नंतर पिंपरी-चिंचवडला टपली मारली अन् अंतर्गत सुंदोपसुंदी आज पक्षाच्याच जीवावर उठली. राष्ट्रवादीचे ४० हून अधिक नगरसेवक पक्षातून बाहेर पडणार आहेत. त्यातील काही जण आधीच बाहेर पडले आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी उघडी पडली. तरीही अजितदादा महापालिकेत एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाल्या नसल्याचा डंका पिटला खरा; पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. आता राष्ट्रवादीला दोन अंकी मजल मारता आली तरी त्यांनी मोठे यश मिळविले असे होईल.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin