Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर गांधीजींऐवजी मोदींचा फोटो


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवरील महात्मा गांधींचा फोटो हटवून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा लावण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत मुंबईत विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात आज दुपारी अनेक कर्मचाऱ्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आत्मक्लेष करून घेतला. स्वदेशीची चळवळ उभारणाऱ्या महात्मा गांधींनी नेहमीच खादीचा आग्रह धरला. त्या विचारांतूनच खादी आणि ग्रामोद्योगाचा देशभर प्रसार झाला. असं असतानाच वर्षानुवर्षांची परंपरा मोडून खुद्द खादी आणि ग्रामोद्योग आयोगानेच महात्मा गांधी यांचा फोटो वार्षिक कॅलेंडर व डायरीतून वगळली आहे. त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चरख्यावरील फोटो लावण्यात आला आहे. कॅलेंडरच्या बाराही पानांवर मोदी यांचाच फोटो आहे. यामुळे कर्मचारी वर्गाने उघड नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. गेल्यावर्षी ही बाब कर्मचाऱ्यांनी चेअरमन विनयकुमार सक्सेना तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी पुढच्यावर्षी यात दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र यावर्षीही यात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. याबाबत काल खादी ग्रामोद्योगच्या मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एक तातडीची सभा घेण्यात आली. या सभेत गुरुवारी जेवणाच्या वेळेत दुपारी दीड ते दोन दरम्यान प्रार्थना कक्षात आत्मक्लेष करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin