Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


मानवी तस्करीत २००० च्या नोटेचा सर्वाधिक वापर - कैलाश सत्यार्थी


Main News

भोपाळ, दि. १२ (पीसीबी) - नोटाबंदीनंतर मानवी तस्करीला आळा बसेल, असे सुरुवातीला वाटत होते, परंतु या व्यवसायात आता २००० च्या नोटेचा सर्वाधिक वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे, अशी खंत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली. दोन महिन्यातच या व्यवसायातील लोकांकडे २००० च्या नोटा आल्या आहेत आणि त्याचा वापर आता व्यवहारांसाठी होत आहे, असे सत्यार्थी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यावेळी ते म्हणाले की, मुलांची आणि महिलांची तस्करी थांबावायची असेल तर अनेक उपाययोजना होणे आवश्यक आहे. देशामध्ये मानवी संबंधी कायद्यांमध्ये सुधारणा होणे आवश्यक असून हे कायदे पीडितांना समजून घेणारे असायला हवेत. यामध्ये तक्रार निवारणाबद्दल तरतुदी असणे आवश्यक आहे, असे सत्यार्थी यांनी सांगितले. बचपन बचाओ आंदोलन या संस्थेचे प्रमुख सत्यार्थी यांचा काल ६३ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी मानवी तस्करी, बाल कामगार या प्रश्नांवर चर्चा केली. पश्चिम बंगालमध्ये घरगुती कामांसाठी नोकरभरतीच्या अनेक खोट्या संस्था काम करतात या संस्थामार्फत मानवी तस्करी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा या प्रकारांना आळा बसण्यासाठी शासनाने पडताळणीची प्रक्रिया कठोर करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. तसेच जनतेनी देखील जागरुक राहणे आवश्यक आहे. अशा प्रकारांबाबत समजताच जनतेनी पोलिसांना संपर्क करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin