Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


पंजाब, गोवा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली मतदार यादी जाहीर केली. केंद्रीय आरोग्या मंत्री जे.पी नड्डा यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. यात पंजाबसाठी १७ तर गोव्यासाठी २९ उमेदवारांची घोषणा केली आहे. पंजाबमध्ये २३ जागांवर भाजप आपला उमेदवार उभा करणार असून ९४ जागांवर भाजपचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल त्यांचे उमेदवार उभे करणार आहे. पंजाबमध्ये गेली १० वर्षं सत्तेवर असणाऱ्या भाजप- शिरोमणी अकाली दलाला यंदा अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला कमबॅक करायला अनुकूल वातावरण तयार होईल. पण भाजप आणि काँग्रेसला ‘आप’ फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंजाबमध्ये सत्ता मिळाली तर ‘फक्त दिल्लीपुरता मर्यादित असणारा पक्ष’ अशी आपली प्रतिमा पुसून काढायला आपला मदत होईल. भाजपच्या आजच्या पत्रकार परिषदेत नड्डा यांनी गोवा विधानसभा निवडणुकांसाठीही २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सध्या या राज्यात भाजप सत्तेवर आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने माजी इन्स्पेक्टर जनरल एल्विस गोम्स यांचे नाव पुढे केले आहे. गोव्याच्या राजकारणातून राष्ट्रीय पातळीवर गेलेल्या केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. त्यांच्या या होमपीचवर भाजपची कामगिरी कशी राहते, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin