Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव आणि लक्ष्मण जगतापांची ताकद विरूद्ध अजितदादांचा करिष्मा


Main News

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या ४६ वर्षांत सातत्याने काँग्रेस सत्तेत राहिली आहे. २००२ पासून गेली १५ वर्षे काँग्रेसमधून फुटलेल्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातीलच नव्हे तर नगरपालिका निवडणुकीतूनही राजकीय वातावरण बदलताना दिसत आहे. प्रत्येक कामातील भ्रष्टाचारामुळे आणि सिद्धही झाले असल्यामुळे राष्ट्रवादीच्या महापालिका कारभाराबद्दल जनतेत नाराजी वाढली आहे. दुसरीकडे गेल्या दीड, दोन वर्षात राज्यातील भाजप सरकारकडून शहरातील विकासाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागले आहेत. नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना “स्मार्ट सिटी” कागदावरून आता अंमलबजावणीपर्यंत आली आहे. त्यामुळे भाजपचा प्रभाव आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची ताकद विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा करिष्मा अशीच होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक बुधवारी जाहीर झाल्यानंतर आता पुढील सत्तेचे आडाखे बांधणे सुरू झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सत्तेत आहे. काँग्रेस विरोधी पक्षात असले, तरी राष्ट्रवादीच्या सत्तेत सोबती आहे. पण या दोन्ही पक्षांनी गेल्या १५ वर्षांत आजवर कधीही आघाडी केली नाही. त्यांना टक्कर देण्यासाठी भाजप-सेनेकडून युती झाली, नंतर तेही स्वतंत्र लढले. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वाधिक मोठा पक्ष ठरला. भाजप आणि शिवसेनेला १५ च्या वर कधी जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या निकालात कोणाचा फरफॉर्मन्स कसा राहतो, हा बदलत्या राजकीय समीकरणात औत्सुक्याचा विषय आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin