Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


भिलई येथे १ लाख लोकांनी घातला एकाच वेळी सूर्य नमस्कार!


Main News

भिलई, दि. १२ (पीसीबी) - येथील जयंती स्टेडियमवर स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या भव्य योग शिबिरात तब्बल १ लाख लोकांनी सूर्य नमस्कार तसेच योगा केला. या शिबिरात एकाच वेळी १ लाख लोकांनी सूर्य नमस्कार घातल्याने विश्वविक्रम झाला असून याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या वेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह आणि योगगुरू बाबा रामदेव उपस्थित होते. या शिबिराला एक लाखाहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. यावेळी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीमही हजर होती. त्यांनी सूर्य नमस्कारांच्या नव्या विक्रमाची दखल घेत प्रमाणपत्रही दिले. २०१६ मध्ये रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत ५० हजार लोकांनी एकाचवेळी एकाच ठिकाणी योग केला होता. तो विक्रमही आज मोडला गेला आहे. दरम्यान, बाबा रामदेव आणि क्रिकेटर हरभजन सिंग यांचीही येथे एका क्रिकेट लीगच्या निमित्ताने भेट झाली. यावेळी दोघांनी पंजा लढवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin