Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


पाकिस्तानाच्या ताब्यातील चंदू चव्हाण लवकरच मायदेशी परतणार


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण लवकरच मायदेशी परतणार आहेत. चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात असून त्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. मूळचे धुळ्याचे असणारे २२ वर्षांचे चंदू चव्हाण ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होते. ३० सप्टेंबरला गस्त घालत असताना चंदू चव्हाण यांनी नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. यानंतर चंदू चव्हाण यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले. ‘चंदू चव्हाण यांच्याविषयी दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत चर्चा झाली. चंदू चव्हाण सुरक्षित असून त्यांची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या डिजीएमओंनी दिली. चंदू चव्हाण यांची लवकरच मुक्तता करण्यात येईल, असेदेखील पाकिस्तानच्या डिजीएमओंनी सांगितले,’ अशी माहिती भामरे यांनी दिली आहे. चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी डिजीएमओ स्तरावर चर्चा सुरू आहे. चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी भारताच्या डिजीएमओंनी १५ ते २० वेळा पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत संवाद साधला आहे. त्यांनी चंदू चव्हाण सुरक्षित असून लवकरच त्यांची सुटका केली जाईल, असे म्हटले आहे,’ अशी माहिती सुभाष भामरे यांनी दिली आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin