Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


नितेश राणेंवर गुन्हा दाखल करणार की नाही- न्यायालयाचा सवाल


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – कार्यकर्त्यांकरवी व्यावसायिकाला धमकावल्याच्या आरोपाप्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणार की नाही याचा निर्णय एक आठवड्यात घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वांद्रे पोलिसांना दिले आहेत. गुन्हा नोंदवला जाऊ शकत नसेल तर तो का येत नाही, याची कारणमीमांसाही पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नितेश यांच्या समर्थकांनी कार्यालयात घुसून ते रिकामे करण्यासाठी आपल्याला धमकावल्याचा आरोप करणारी याचिका रोहित कंधारी या व्यावसायिकाने केली आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी याचिकेतील आरोपांची दखल घेत नितेश यांच्यावर गुन्हा दाखल करायचा की नाही याबाबत आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने वांद्रे पोलिसांना दिले. नितेश यांच्या समर्थकांकडून आपल्या व कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याची भीती कंधारी यांनी व्यक्त केल्यावर पोलीस संरक्षणासाठी पोलिसांकडे अर्ज करण्याचे निर्देश न्यायालयाने त्यांना दिले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin