Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


जिल्हा परिषदांमध्ये भाजपची खरी कसोटी!


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – शहरी तसेच निमशहरी भागांमध्ये यश मिळाल्याने भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी नोटाबंदीचा ग्रामीण भागात बसलेला फटका, सहकारी बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये विजयाची घौडदौड कायम ठेवण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. भाजप हा शहरी तसेच मध्यमवर्गीयांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. हे चित्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने बदलले होते. लोकसभा निवडणुकीत शहरीबरोबरच ग्रामीण भागातही भाजपला चांगले यश मिळाले होते. राज्य विधानसभा निवडणुकीतही राज्याच्या ग्रामीण भागात भाजपचे आमदार निवडून आले. फक्त शहरी स्वरूप बदलून पक्ष ग्रामीण भागात रुजविण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन वर्षांत प्रयत्न केले आहेत. पाण्याचे नियोजन, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात झाले. नगरपालिका निवडणुकांमध्ये शहरीबरोबरच निमशहरी भागांमध्ये मिळालेल्या यशाने भाजपच्या गोटात उत्साह वाढला आहे. कोणत्याही परिथितीत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या सर करायच्याच हा निर्धार भाजपने केला आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin