Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


नागपुरात ५० हजार स्वस्त घरे देणार; टेंडर निघाले


Main News

नागपूर, दि. १२ (पीसीबी) – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपुरात ५० हजार स्वस्त घरे उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० हजार घरे तयार करण्यात येणार आहेत. नागपूर सुधार प्रन्यासने या १० हजार घरांसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. २०१९ पर्यंत ५० हजार घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत केंद्र सरकारने देशातील बेघर कुटुंबांना पक्की घरे देण्याची योजना तयार केली आहे. महाराष्ट्र सरकार २०२२ पर्यंत थांबणार नसून २०१९ पर्यंतच राज्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना हक्काची पक्की घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपुरात ५० हजार स्वस्त घरे उभारण्यात येणार आहेत. घरांचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या गरिबांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. सुमारे ३०० चौरस फुटांचे घर अवघ्या अडीच लाखांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मौजा तरोडी (खुर्द), मौजा जयताळा, मौजा भरतवाडा-पुनापूर या चार जागांवर १५ हजार १९६ घरकुलांचे नियोजन करण्यात आले असल्याचे नासुप्रकडून कळविण्यात आले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin