Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


भारताचा आर्थिक विकासदर ७ टक्केच राहिल – जागतिक बँक


Main News

वॉशिंग्टन, दि. १२ (पीसीबी) – नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर सात टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी बँकेने अर्थव्यवस्थेचा विकासदर ७.६ टक्के राहील, असे नमूद केले होते. मात्र, २०१७-१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी विकासदर अनुक्रमे ७.६ टक्के आणि ७.८ टक्के राहील, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. भारत सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे ३१ मार्च २०१७ रोजी संपणाऱ्या आर्थिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग घटेल, असेही जागतिक बँकेने नमूद केले आहे. नोटाबंदीबरोबरच कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि घटलेले कृषी उत्पादनही सरकारची चिंता वाढवू शकते, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. बँकेच्या अहवालानुसार नव्याने उदयाला येणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांकडे वाटचाल करीत आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin