Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


अॅमेझॉनवर तिरंग्याची पायपुसणी विक्रीला; कडक कारवाईचा केंद्राचा इशारा


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – अमेझॉनच्या कॅनडातील वेबसाईटवर तिरंग्यासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत. त्याविरोधात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. स्वराज यांनी अमेझॉन वेबसाईटवर कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच कॅनडातील भारतीय दुतावासाला अॅमेझॉनवर कारवाई करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या सुषमा स्वराज यांना ट्विट करुन तिरंग्यासारख्या पायपुसण्याची माहिती एका व्यक्तीने दिली होती. त्याची लगेच दखल घेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉनवर कारवाईचे संकेत दिले आहेत. अॅमेझॉनने तिरंग्यासारख्या पायपुसण्याची विक्री लगेच थांबवावी. तसेच भारताच्या तिरंग्याच्या अवमाननाप्रकरणी माफी मागावी, असे आपल्या ट्विटमध्ये स्वराज यांनी म्हटले आहे. अमेझॉनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला व्हिजा देणार नसल्याचेही सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. सध्या ज्या अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे भारताचा व्हिजा आहे. त्यांचा व्हिजा रद्द करणार असल्याचे स्वराज यांनी सांगितले आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin