Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


मुंबईत नगरसेवक होण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाचा राजीनामा


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - जोगेश्वरीत राहणारे ५४ वर्षीय गंगाराम कांबळे यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. खाकी वर्दी उतरवून आता खादी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांची ३२ वर्ष पोलीस खात्यात सेवा झाली आहे. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरलाच मी पदाचा राजीनामा दिला होता. ५ जानेवारीला हा राजीनामा स्वीकारण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या अनेक समस्या समजल्या. तसेच स्थानिक नागरिकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, असे कांबळे यांनी सांगितले. गरीबीपासून ते गुन्हेगारीपर्यंतच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नागरिकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. राजकीय जाहीरनाम्याचे आश्वासन न देता विकास कामे कशी केली जातात हे मला दाखवून द्यायचे आहे, असे कांबळे यांनी सांगितले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin