Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


..असा आहे पिंपरी महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. याच कालावधीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करता येईल. आलेल्या उमेदवारी अर्जांची ४ फेब्रुवारी रोजी छाननी होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. त्यानंतर २१ फेब्रुवारीला मतदान आणि २३ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यंदा आपला उमेदवारी अर्ज व शपथपत्रे ऑनलाइन भरावे लागणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संगणकप्रणाली विकसित केली आहे. आयोगाने तयार केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज व शपथपत्रे याची माहिती भरून प्रिंट काढावी लागणार आहे. ही प्रिंट निवडणूक आयोगाकडे सादर केल्यावर उमेदवारी अर्ज भरल्याचे ग्राह्य धरण्यात येणार आहे. उमेदवारांना २७ जानेवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ते ३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत प्रिंट काढलेला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल. २९ जानेवारी यादिवशी रविवार असूनही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin