Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


आचारसंहितेमुळे राजकीय होर्डिंग्जची साफसफाई; पदाधिकाऱ्यांची वाहनेही महापालिकेकडे जमा


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन महापालिकेने सुरू केले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स व झेंडे जप्त करण्याचे किंवा काढून टाकण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात हे होर्डिंग लावले आहेत. आचारसंहितेमुळे का होईना शहरात अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर्सची साफसफाई मोहीम सुरू झाली आहे. दरम्यान, आचारसंहितेच्या अंलबजावणीसाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेता यांच्यासह विषय समित्या आणि प्रभाग समित्यांच्या सभापतींची वाहनेही महापालिकेने जमा करून घेतली आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमुळे बुधवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने राजकीय पक्षांकडून शहरात लावण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनर्स व झेंडे काढण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या प्रत्येक भागात, गल्लीबोळात राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी पक्षाचे नेते व स्वतःच्या छबीसह इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स व झेंडे लावले आहेत. ते जप्त करण्याचे किंवा काढून टाकण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin