Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


पाच वर्षांत सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी सभागृह गाजविले; २९ नगरसेवकांनी विचारले लेखी प्रश्न


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणत्या नगरसेवकांनी सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली, याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वसाधारण सभांमध्ये फक्त २९ नगरसेवकांनी लेखी प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये नगरसेविका सीमा सावळे, भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, आर. एस. कुमार आणि प्रथमच निवडून आलेले राजेंद्र जगताप, आशा शेंडगे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. नगरसेविका सीमा सावळे यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या अधिकारांचा वापर करून अनेक चुकीच्या कामांना सभागृहात कडाडून विरोध करून सत्ताधारी राष्ट्रवादीला घाम फोडल्याचे सभागृहातील चित्र होते. त्यांना नगरसेविका आशा शेंडगे यांनीही तेवढ्याच ताकदीने साथ दिल्याचे शहराने पाहिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विलास कुटे यांनी पाच वर्षात कोणत्या नगरसेवकाने किती लेखी प्रश्न विचारले आहेत, याची माहिती महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे. महापालिकेत निवडून आलेले १२८ आणि स्वीकृत पाच असे १३३ नगरसेवक आहेत. यापैकी २९ नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात महापालिका सभेत प्रशासनाला लेखी प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये प्रथमच निवडून आलेल्या १३ नगरसेवकांचा समावेश आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin