Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


महापालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान; २३ फेब्रुवारीला मतमोजणी


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड व पुणेसह राज्यातील दहा नगरपालिका आणि २६ जिल्हापरिषदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. ११) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महापालिकांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी, तर जिल्हा परिषदांसाठी १६ आणि २१ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड व पुणेसह संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील दहा नगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा बुधवारी केली. दहा महापालिकांमध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूरचा समावेश आहे. मुंबई वगळता उर्वरित नऊ महापालिकांची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका १६ आणि २१ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी सर्वांची मतमोजणी होणार आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin