Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


नोटाबंदीचा निर्णय हा भाजप, मोदींच्या शेवटाची नांदी - मनमोहन सिंग


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची खूप मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक रणनीती पूर्णतः फसली असून मोदींच्या पोकळ आश्वासनांची पोलखोल झाली आहे. नोटाबंदीचा निर्णय ही भारतीय जनता पक्ष आणि मोदींच्या शेवटाची नांदी असेल. मोदी हे गेली दोन वर्षे भारताची अर्थव्यवस्था कशी असेल याची आखणी करीत होते, परंतु ती परिणामकारक ठरली नसल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. जनवेदना आंदोलनावेळी बोलताना मनमोहन सिंग म्हणाले की, नोटाबंदी ही भाजपच्या अंताची सुरुवात आहे. मोदी यांनी दिलेली सर्व वचने पोकळ होती. मोदी म्हणत होते की ते भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकतील, परंतु आता त्यांच्या म्हणण्यातील अर्थ कळत असल्याचे सिंग यांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारताचा वृद्धिदर हा ६.३ टक्क्यांच्या खाली जाणार असल्याचे भाकीत जगातील सर्व प्रमुख संशोधन संस्थांनी केले आहे. तेव्हा येणारा काळ कठीण असणार आहे. या एकाच उदाहरणावरुन कळू शकेल ही नोटाबंदीमुळे किती नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसातील परिस्थिती खराब होती परंतु आता ती दयनीय होत असल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin