Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


युतीबाबत अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री घेणार - उद्धव ठाकरे


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांकडून युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. आज सकाळी भाजपा नेत्यांची मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेला युतीबाबत निमंत्रण देण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांना बोलताना म्हणाले की, मी युतीबाबत कधी नकारात्मक नव्हतो, जागावाटपाबात माझ्याकडे एक नवा फॉर्म्युला आहे. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी ३-३ नेते जागा वाटपाची चर्चा करतील, पण अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण जागावाटप झाल्यावरचं अंतिम चित्र समोर येईल. आजपासून युतीच्या जागावाटपासाठी चर्चा सुरु करणार असल्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले आहे. दरम्यान, युती करायचीच असेल तर ती लवकर व्हायला हवी, अन्यथा निवडणुका होऊन जातील, अशी भावना दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यांनी जाहीरपणे मांडलेल्या या भूमिकेला भाजपकडून प्रतिसाद मिळेल, असे बोलले जात होते. त्यानुसार भाजपने शिवसेनेला युतीच्या चर्चेसाठी आमंत्रण देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin