Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


मुंबई महापालिकेत राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - महापालिका निवडणुकीत प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करु, असे सांगणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मुंबई महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावरच लढणार असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बुधवारी फेसबुकवरुन लाईव्ह चॅटद्वारे संवाद साधला. मनसेकडे जर युतीचा प्रस्ताव आला तर यावेळी विचार करेल. असे वक्तव्य मंगळवारी राज ठाकरे यांनी केले होते. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘मनसे स्वबळावरच लढणार, अद्याप मी कुणाकडे गेलेलो नाही आणि कुणी माझ्याकडे आलेले नाही. त्यामुळे या सर्व चर्चांना सध्या तरी काहीही अर्थ नाही.’ महापालिका निवडणूक, भाजप, शिवसेना, नोटाबंदी ते राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याच्या वादावर राज ठाकरे यांनी भाष्य केले. शिवसेना-भजपची युती होण्याची शक्यता धुसर असताना ‘प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करू’ असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र बुधवारी फेसबुक लाईव्हद्वारे राज ठाकरेंनी स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin