Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


भविष्यात पोलिस तक्रार करतानाही लागणार आधार कार्ड


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – भविष्यात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवतानाही आधार कार्ड बंधनकारक होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सर्व सरकारी सुविधा, सेवा, अनुदान आणि लाभ घेणाऱ्यांना आधार कार्ड बंधनकारक करण्याची तयारी सुरु केली आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटवर सूट देताना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि ईपीएफसाठी आधार कार्ड बंधनकारक केले होते. आता लवकरच केंद्र सरकार सर्व प्रकारच्या सरकारी सेवांसाठी ओळखपत्र म्हणून आधार बंधनकारक करण्याच्या विचारात आहे. संसदेत मंजूर केलेल्या आधार कार्ड विधेयेकानुसार कोणतेही अनुदान, लाभ किंवा सेवेसाठी भारत सरकारच्या निधीतून खर्च होत असल्यास त्यासाठी आधार कार्ड बंधनकारक असणार आहे. आधार कार्डचे फायदे लक्षात घेता प्रत्येक विभागाला आधार कार्डचा वापर करावा लागेल. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल तर तो व्यक्ती नेमका कोण आहे हे जाणून घेण्याची गरज नाही का असा प्रश्नही एका अधिकाऱ्याने उपस्थित केला.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin