Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


महापालिका प्रशासनावरील निवडणूकखर्च बंधनमुक्त; खर्चावरील निर्बंध हटविले


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - मतदारांच्या संख्येनुसार निवडणुकीचा खर्च करण्याचे महापालिका प्रशासनावरील निर्बंध निवडणूक आयोगाने हटविले आहेत. २००७ मध्ये प्रत्येक मतदारामागे जास्तीत जास्त १४ रुपये खर्च करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली होती. तर, २०१२ साली प्रती मतदार ३५ रुपये खर्च करण्याचे बंधन होते. मात्र, या खर्चात निवडणूक प्रक्रिया राबविणे आणि मतदानाचा टक्का वाढविण्यात अडचणी येत असल्याने हे निर्बंध यंदा उठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे उमेदवारांना निवडणूकखर्च मर्यादा असली तरी निवडणूकप्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय खर्चाला मर्यादा नसेल. २००७ मध्ये महापालिका निवडणुकीत प्रत्येक मतदारामागे जास्तीत जास्त १४ रुपये खर्च करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली होती. त्यावेळी ७ लाख ६९ हजार ४८३ मतदार होते. २०१२ मध्ये प्रतिमतदार ३५ रुपये खर्च करण्याची मर्यादा होती. त्यावर्षी पिंपरी-चिंचवडमध्ये ११ लाख ५२ हजार ५८९ मतदार होते. यंदा मतदारांची संख्या १२ लाखांच्यावर गेली असली तरी त्या संख्येचा आधार निवडणुकीच्या खर्चासाठी घेतला जाणार नसल्याचे महापालिकेतल्या सूत्रांनी सांगितले. आयोगाचे तसे निर्देश असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin