Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याकडून रेशनचा काळाबाजार!


Main News

श्रीनगर, दि. ११ (पीसीबी) - भारतीय जवानांना पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट अन्नाबाबतचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करून तेज बहादूर यादव या जवानाने गौप्यस्फोट केला होता. श्रीनगरमधील काही नागरिकांनी त्याच्या आरोपांना पुष्टी देणारा धक्कादायक खुलासा केला आहे. सीमा सुरक्षा दलाचे काही अधिकारी आपल्याला बाजारभावापेक्षा अर्ध्या किंमतीत इंधन आणि धान्य विकतात, असा गंभीर दावा बीएसएफ तळांच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. बीएसएफ जवानांसाठी सरकारकडून पुरेसा धान्यपुरवठा होतो. परंतु, हे सामान सैनिकांपर्यंत पोहोचत नाही. कारण, काही अधिकारी दुकानांशी संधान साधून हे अन्नधान्य त्यांना कमी किंमतीत विकून स्वतःचे खिसे भरतात, असा आरोप तेज बहादूर यादवने केला होता. त्यावरून बीएसएफने त्याचा आरोप फेटाळून लावून उलट त्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बुधवारपर्यंत त्याबाबतचा अहवाल मागवला आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin