Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल आज वाजणार


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - मुंबई, ठाणेसह राज्यातील १० महत्त्वाच्या महापालिकांमधील निवडणुकीचा कार्यक्रम आज दुपारी जाहीर होणार आहे. चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत १० महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्येच निवडणुका होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी यापूर्वीच दिली आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या १० महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे. महापालिकेसोबत २६ जिल्हा परिषदांमधील निवडणुकीचा कार्यक्रमही आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणा, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे. मार्चमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा असल्याने महापालिका निवडणुका फेब्रुवारीतच घेतल्या जातील. त्याची तयारी सुरू असून प्रशासकीय अधिकारी, महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज.स. सहारिया यांनी रविवारी सांगितले होते.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin