Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


कानपूरमध्ये दोन कारमधून १० कोटींच्या नव्या नोटा जप्त


Main News

कानपूर, दि. ११ (पीसीबी) - उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दोन वेगवेगळ्या कारमधून १० कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नाकाबंदीदरम्यान कानपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यातील एक गाडी हमीरपूरला जात होती, तर दुसरी लखनऊला जात होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानपूरमध्ये मंगळवारी दिवसभर वाहनांची तपासणी सुरु होती. यावेळी खासगी गाड्यांमध्ये कोट्यवधी रुपये सापडले. या दोन्ही गाड्यांमधील लोकांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे एवढी रक्कम जवळ बाळगण्याबद्दलची कोणतीही कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आयकर आणि निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भातील माहिती दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गाडीतून पैसे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी दहा कोटी रुपये जप्त केले आहेत. सर्वाधिक रक्कम अलाहाबाद बँक आणि अलाहाबाद ग्रामीण बँकांची असल्याचे कळते. आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहे. जप्त कलेली रक्कम बँक आणि व्यापाऱ्यांची असल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin