Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


नोटाबंदीनंतर बेहिशेबी चार लाख कोटी बँकांमध्ये जमा?


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - नोटाबंदीनंतर बँक खात्यांतील जमा रकमेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून, यातील सुमारे तीन ते चार लाख कोटी रक्कम प्राप्तिकर चुकवून जमा केलेली असावी, असा कयास सरकारने व्यक्त केला आहे. ही रक्कम ५०० व १००० च्या रद्द नोटांच्या स्वरूपात बँकांतून जमा केली गेली आहे. अशा प्रकारे अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या रकमेची चौकशी करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाला देण्यात आले आहेत. यातील बव्हंशी रक्कम कर चुकवून जमवलेली असण्याची शक्यता गृहित धरून ही रक्कम भरणाऱ्या जमाकर्त्यांना प्राप्तिकर विभाग नोटिसा पाठवणार आहे. सरकारकडे नोटाबंदीच्या ५० दिवसांतील बँकांच्या जमा रकमेची प्रचंड माहिती जमा झाली असून, त्यातूनच सरकारला दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम तब्बल ६० लाख बँक खात्यांतून भरली गेल्याची माहिती मिळाली आहे. या खात्यांत एकूण ७.३४ लाख कोटी रुपये रक्कम भरली गेल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक खात्यात दोन ते अडीच लाख रुपये याप्रमाणे ४२ हजार कोटी रुपये भरण्यात आलेल्या खात्यांचे पॅन क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा पत्ते प्राप्तिकर खात्याकडे उपलब्ध आहेत.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin