Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


मुंबई महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेचा भाजपला ‘अल्टिमेटम’


Main News

मुंबई, दि.१० (पीसीबी) - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ‘अल्टिमेटम’ दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्याआधी युतीचा निर्णय घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान भाजपकडून युतीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत तर युती होईल की नाही, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात दोन्ही पक्षांतील काही नेते स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे शिवसेनेने सर्व प्रभागांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे समजते. वरिष्ठ पातळीवरून जातीने त्यात लक्ष घातले जात आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप हा अव्वल स्थानी असल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे. पण मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढणे जोखमीचे असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत असल्याची चर्चा आहे. तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीसाठी आग्रही आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin