Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


अभिनेता अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ भाजपचा प्रचार करणार


Main News

लखनौ, दि. १० (पीसीबी) - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच आता अभिनेत्यांचाही आधार घेण्याची रणनिती आखली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ हे दोघेही भाजपचा प्रचार करणार आहेत. अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ हे दोघेही भाजपसाठी प्रचार करणार आहेत. सुरुवातीला हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र अर्जुन रामपालने सक्रीय राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘मी काही राजकारणी नाही, मी राजकारणासाठी इथे आलो नाही. मी फक्त भाजपला कसा पाठिंबा देता येईल यासाठी इथे आलो’ असे त्याने सांगितले. उत्तरप्रदेशमध्ये पत्रकारांशी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली. जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल या दोघांनीही आज भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेतली. या भेटीत उत्तर प्रदेश निवडणुकीतील प्रचार करण्याचे या दोघांनी सांगितले. केवळ पक्षाचा प्रचार करण्यापेक्षा भाजपमध्येच सामिल होण्याचे आवतनही भाजपने या दोघांना दिल्याचे समजते. जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारातही उतरविण्याची रणनिती भाजप आखत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin