Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


सरकारने नोटाबंदीची पूर्वकल्पना आरबीआयला दिली होती


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर आरबीआयने मोठा खुलासा केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाची केंद्र सरकारने एक दिवस आधी कल्पना दिल्याचे आरबीआयने सांगितले आहे. पहिल्यांदा नोटाबंदीचा निर्णय हा आरबीआयचा असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. आरबीआयने दिलेल्या ७ पानांच्या दस्तावेजातून हे उघड झाले आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या ३ समस्यांना लगाम घालण्यासाठी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याचा सरकारने प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावात बनावट नोटा, दहशतवाद्यांना मिळणारा निधी, काळा पैशाचा उल्लेख आहे, असे या दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या एका आठवड्यानंतर राज्यसभेत या विषयावरही चर्चाही झाली. त्यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने या प्रस्तावाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तो सरकारकडे आला आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली आणि जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली, असे सांगितले होते. मात्र हा निर्णय आरबीआयने नव्हे, तर सरकारनेच घेतल्याचे दस्तावेजाच्या माध्यमातून समोर आले आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin