Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


मोदींनीही मन मोठे करुन आई – पत्नी सोबत राहायला हवे - केजरीवाल


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीनुसार वयोवृद्ध आई आणि पत्नीला स्वतःसोबत राहू दिले पाहिजे. पंतप्रधानांचे निवासस्थान खूप मोठे आहे. मोदींनीही मन मोठे करुन आई – पत्नी सोबत राहायला हवे, असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. तसेच मी आपल्या आईसोबत राहतो, रोज त्यांचा आशीर्वाद घेतो. पण मी त्याचा गवगवा करत नाही, असेही केजरीवाल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सकाळी लवकर उठून योगासन करण्याचे टाळून आपल्या आई हिराबा यांची भेट घेतली. मोदींच्या या भेटीवर अरविंद केजरीवाल यांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटच्या माध्यमातून केजरीवाल यांनी मोदींना आई आणि पत्नीला सोबत राहायला नेण्याचा सल्लाच दिला. आणखी केजरीवाल म्हणाले, मी माझ्या आईला राजकारणासाठी बँकेच्या रांगेत उभे करत नाही. नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. त्यावेळीही केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी मुक्कामास आहेत. तर त्यांच्या मातोश्री मेहसणा येथे भावासोबत राहतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून मेहसाणा येथे त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin