Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


काळा पैसा पांढरा करण्यात सहकारी बँकांची महत्वाची भूमिका - आयकर विभाग


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सहकारी बँकांनी महत्वाची भूमिका निभावली, असा निष्कर्ष आयकर विभागाने केलेल्या तपासणीतून समोर आला आहे. सहकारी बँकांनी नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्याचे काम केल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. आयकर विभागाच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर रेाजी ५०० व १००० रूपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले होते. या गैरव्यवहारात अनेकांचे लागेबंधे दिसून आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. या बँकांनी मोठ्या चातुर्याने काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग अवलंबला होता. राजस्थानमधील अलवर येथील एका बँकेच्या संचालकांनी ९० लोकांच्या नावाने कर्ज काढले आणि ८ कोटींचा चुना लावल्याचे आढळून आले होते. तर व्यवस्थापनाने दोन कोटी रूपयांचे व्यक्तिगत बेहिशेबी पैसा पांढरा करण्यासाठी वापरला. जयपूर येथील एका सहकारी बँकेत दीड कोटी रूपये बँकेच्या क्लिअरिंग रूममधील एका कपाटात सापडले. आयकर विभागाने अनेक शहरांतील बँकांचे लॉकर तपासले असता मोठ्याप्रमाणात रोकडे आढळून आली. यामध्ये सोलापूर, पंढरपूर, सूरत आणि जयपूर येथील बँकांचा यामध्ये समावेश आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin