Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


नोटाबंदीनंतर ६० लाख बँक खात्यांमध्ये प्रत्येकी दोन लाख जमा


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या रोख रकमेची माहिती समोर आली असून ६० लाखांहून अधिक बँक खात्यांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती उघडकीस आली आहे. नोटाबंदीनंतर तीन ते चार लाख कोटी रुपये अघोषित संपत्ती बँकांमध्ये जमा झाली आहे. आयकर विभाग त्याची चौकशी करत आहे, अशी माहिती एका बँक अधिकाऱ्याने दिली आहे. नोटाबंदीनंतर लोकांनी कर्जफेडीच्या स्वरुपात ८० हजार कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. तर निष्क्रिय खात्यांमध्ये २५ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, सहकारी बँकांमधील विविध खात्यांमध्ये जमा झालेल्या १६ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय कसून चौकशी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. ईशान्येकडील राज्यांमधील बँकांच्या खात्यांमध्ये ९ नोव्हेंबरनंतर १० हजार ७०० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. वीज कंपन्यांसाठी नोटाबंदीचा निर्णय अधिक लाभदायक ठरला आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात थकीत रक्कम अदा केली आहे. तत्पूर्वी, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी विविध स्वरुपातील करवसुलीची आकडेवारी जाहीर केली होती. नोटाबंदीनंतर सीमाशुल्क वगळता उर्वरित सर्व प्रकारच्या करवसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin