Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


वायसीएमसाठी ७० लाखांची मशीन पावणे तीन कोटींना खरेदी; राष्ट्रवादी एसीबीच्या जाळ्यात


Main News

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासाठी बाजारात ७० लाखांना मिळणारे हायपर बोलिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) मशीन २ कोटी ७८ लाख रुपयांना खरेदी प्रकरणाची आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात महापालिकेची तत्कालीन तीन डॉक्टर, स्थायी समिती आणि राष्ट्रवादीच्या एका माजी महापौरांनी संगनमताने करदात्या नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांवर हात साफ केला आहे. राज्यात सत्तेत असताना राष्ट्रवादीने हे प्रकरण दडपले आणि महापालिका सभागृहात दोषी अधिकाऱ्याला पाठीशी घातले. आता या प्रकरणाची चौकशी होणार असल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीचे धाबे दणाणले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासाठी आवश्यकता नसताना ७० लाख रुपयांचे एचबीओटी मशीन २ कोटी ७९ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. महापालिकेच्या चौकशीत ही मशीन खरेदी करताना कोणतेच नियम पाळले नसल्याचे समोर आले. मशीन बाहेरून मागविल्याचे दाखविले असतानाही त्यावर जकातकर भरला नसल्याचेही सिद्ध झाले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin